STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

समजून घेत नाही

समजून घेत नाही

1 min
14.8K


बोललो की रागावतेस

नाही बोललो तरी रागावतेस

तुझ्या मनाची नाळ हेरता हेरता

माझीच मात्र दमछाक होते.

कधी शब्दही ऐकून घेत नाहीस

कधी बोलूनही देत नाहीस

मनाचा पसारा मांडतो मी सारा

तू मात्र समजुन घेत नाहीस...

कधी नुसत्याच इशाऱ्रयांच रास मांडतेस

कधी अश्रूंचा पूर वाहतेस

माझ्या निष्पाप अनामिक शब्दांनी

समाधान तुझे होत नाही

माझ्या बाहुपाशात मलाच घट्ट मिठी मारून

तू माझी होत नाहीस.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance