समजून घे तू
समजून घे तू
सुखी जीवन जगाण्या
स्वभावी हवी तडजोड
समजूनी घेता एकमेका
जीवन आंब्याची फोड
नसावा आपलाच हेका
ऐकावे दुस-यांचे पण
ठरते मार्गदर्शक मत
राखले जाते दुजाचे मन
समजूनी घे तू थोडे
नसते सदा आपलेच खरे
नीट विचार करता कळे
समजून घेतले झाले बरे
समजून घे तू
क्षणाचा विचार करिता क्षणी
विचारांती उमजेल
उगा धरिला हट्ट मनी