STORYMIRROR

Vaishali Belsare

Romance

3  

Vaishali Belsare

Romance

सलगी

सलगी

1 min
211

चाहूल तुझ्या येण्याची

की भास वेडावलेला

हा जीव बावरा सख्या

तुजसाठी ओढाळलेला......


हि धुंद तुझ्या प्रीतीची

उतरेना काही केल्या

कैफात आज मनसोक्त

दाही दिशा नाहलेल्या......


अलगुज गारव्याचे

स्पर्शून कानी गुंजते

प्रत्येक श्वास माझा

तुझ्या श्वासात गूंफते......


रंगले चित्र वेगळे

तुझ्या प्रीतवेड्या जगी

जरी वेडेपणा सारा

करे मनाशी सलगी......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance