Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Khaladkar

Tragedy

3  

Sunil Khaladkar

Tragedy

सल....

सल....

1 min
275


जीव गुंतलाय रे तुझ्यात, म्ह्णून 

घाव हृदयावर मी सोसत आहे...

कळली नाही रे कदर तुला प्रेमाची,

हीच सल जगताना, मला सारखी बोचत आहे...||1||


खूप स्वप्न पाहिली होती, लग्नानंतरची,

आता फोटो अल्बमवरील धूळ मी पुसत आहे...

कळली नाही रे कदर तुला प्रेमाची,

हीच सल जगताना, मला सारखी बोचत आहे...||2||


आई बाबांचं प्रेम, भावाची माया,

यांची कमी मला पदोपदी भासत आहे....

कळली नाही रे कदर तुला प्रेमाची,

हीच सल जगताना, मला सारखी बोचत आहे...||3||


सुखाचे क्षण विखूरले इथे , अन 

तांदळातील खडे मी वेचत आहे....

कळली नाही रे कदर तुला प्रेमाची,

हीच सल जगताना, मला सारखी बोचत आहे...||4||


परी होते घरात माझीया , अन आता,

अडगळीत तू मला फेकत आहेस....

कळली नाही रे कदर तुला प्रेमाची,

हीच सल जगताना, मला सारखी बोचत आहे...||5||


Rate this content
Log in