सख्या तुजसाठी
सख्या तुजसाठी
रजनीगंधा जीवनी या
बहरुनी आली
सख्या अस्तित्वाने तव
मधुरता फुलली।।१।।
कमलिनी जीवनी या
अवचीत बहरली
सख्या तव साथीने
कोमलता नटली।।२।।
सुवर्ण चंपक तव रुपे
जीवनी फुलला
सोनसळी सांजवेळ
अवघीच खुलली।।३।।
तव सान्निध्य प्राजक्त
सडा मम अंगणी नित्य
मधुरगंध केशरदीठी लिप्त
परी या सांजवेळी मन विरक्त।।४।।
अबोलीचे नाते आपुले
न बोलता बंध जुळले
नजाकतीने घट्ट विणले
अस्फुट ओठी शब्द गळले।।५।।
शेवंतीची साथ आपुली
श्वेत पित रंगी नटली
पवित्र उर्जा नात्यात रूजली
स्नेहबंधी पाकळी भरगोस हासली।।६।।
तुझी साथ मोगरा सुगंधी
टपोर कळी चांदण सांधी
तरल परिमळ मंदगंधी
तनु दोन परी मनी एकच धुंदी।।७।।
साथ आपुली जाईजुई
नाचती मनी कारंजे थुईथुई
जणु सुगंधी सांज सुरमई
पवित्र्याची बुज ठाईठाई।।८।।
मैत्र आपुले टपोरे गुलाब चुस्त
नित्य नूतन रंगी मदमस्त
गाली हासरे भाव नेमस्त
लाभो दीर्घायु तुज न व्हावा अस्त।।९।।