सखे तुझ्या हसण्याने
सखे तुझ्या हसण्याने
सखे तुझ्या हसण्याने
फुलले गं लक्ष मोती
जणू डाळिंबाचे दाणे
ओठावरी ओघळती
सखे तुझ्या हसण्याने
निर्झरही खळाळती
शुभ्र अभ्र प्रपातांचे
जणू मोती ओघळती
सखे तुझ्या हसण्याने
गाली गुलाब फुलती
धुंद मोगरा गंधाळे
तुझ्या अधरांवरती
सखे तुझ्या हसण्याने
मोर पिसारा फुलवी
फुललेल्या पिसाऱ्याला
मोदभरे तो डुलवी
सखे तुझ्या हसण्याने
मनोमनी सुखावलो
अनिमिष लोचनांनी
तुला पाहत राहिलो

