STORYMIRROR

vinod mohabe

Romance

4  

vinod mohabe

Romance

सखे कधी तरी

सखे कधी तरी

1 min
1.3K

सखे कधी तरी

सखे, तुला कधी तरी भेटावसं वाटतं

पाखरांच्या वनात कधी तरी न्यावसं वाटतं,

एकांत वनात जाऊन कधी तरी बसावसं वाटतं

हृदयातील गोष्टी कधी तरी सांगावसं वाटतं !!धृ !!

  

सखे, तुला कधी तरी स्वप्नात बघावसं वाटतं

तुझ्या कुशीत कधी तरी झोपावसं वाटतं,

तुझ्या डोळ्यांकडे कधी तरी बघत रहावसं वाटतं

तुला कधी तरी आपलं करावसं वाटतं !!१!!


सखे, तुला कधी तरी सात जन्माच्या नात्यात बांधावसं वाटतं

तुझ्या संग पोटभर रडावसं वाटतं,

नदीच्या काठावर जाऊन कधी तरी बसावसं वाटतं 

त्या लहरीकडे बघून कधी तरी जिवनाच्या गोष्टी सांगावसं वाटतं !!२!!


सखे, मिन - मिनत्या दिव्याकडे कधी तरी तुझ्या संग पहावसं वाटतं

सुख दुखाचे ओझे कधी तरी सोबत न्यावासं वाटतं,

चंद्राच्या शितल छायेत कधी तरी तुझ्या संग बसावसं वाटतं

जिवनाच्या अखेरीस कधी तरी संग मरावसं वाटतं !!३!!

 

चांदण्यांना कधी तरी तुझ्या संग स्पर्श करावसं वाटतं

चंद्रावरील डागाला तुझ्या संग कधी तरी मिटावसं वाटतं,

सूर्याच्या कोमल किरणांना तुझ्या संग शरीरावर घ्यावसं वाटतं

आनं त्यातच जिवनाचा अंत करावसं वाटतं !!४!!  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance