STORYMIRROR

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

मी मराठी शाळा बोलते

मी मराठी शाळा बोलते

1 min
258

लवकर येऊनी नाव नोंदवावं 

पहिल्यांदा एकदा हसुनी दाखवावं !

मुले जातात रडणं विसरुनी

मी आहे मराठी शाळेतुनी !!


पहिल्यांदा शिकविते मी हसणे-हसणे 

मग मिळा एकमेकांचे गळे !

सर्व ज्ञानाचे फुल फुलतील बाळा 

मी आहे मराठी शाळा !!


झगडा, भांडण आणि निराशा

यांना मी देते गळफाशा !

हसू आनंदित राहू या बाळा 

मी आहे मराठी शाळा !!


बाई सुंदर गाणे शिकविते

खळूने फळ्यावर मोर काढते !

माझ्याकडे आहे काळा,निळा फळा 

मी आहे मराठी शाळा !!


एक, दोन, तीन, चार

चला आता कुतूम मीनार !

पाच,सहा, सात,आठ चा पाढा

मी आहे मराठी शाळा !!


शिक्षक माझे लई हुशार

मराठीत संवाद साधतात लई खुमार !

तुमच्या वडिलांना अधिकारी,उद्योजक बनवते 

होय मी तीच मराठी शाळा बोलते !!


शिकुनी छत्रपती महाराज गाती मराठीची गाणी

थोर संतांची मी हो जन्मदाती !

ह्या राष्ट्रात बांधिले एकतेचा मळा 

मी आहे तुमची मराठी शाळा !!


माझे शिक्षक शिकवायचे तुम्हाला भूगोल

खडूने फळ्यावर काढुनी मोठा गोल !

चला आता मराठी शिक्षणाकडे पळ काढा 

मी आहे तुमची मराठी शाळा !!


इंग्रजी आहे माझी सावत्री बेजवाबदार बहिण

ना राखिले तिने वाघिणीचे दुध अनं नियमांचे पालन !

म्हणे काका,मामा चाचा हे एकच uncle शब्द

म्हणून मला वाटते माझे गर्व, कसं होऊ शकते एकच शब्द !!


पुन्हा ताठ करुनी मान, मुलं करायचंय मला गोळा 

मी आहे तुमची लाळाची मराठी शाळा !!


Rate this content
Log in