बाबा जूमदेव जी - पुन्हा एकदा येशील का?
बाबा जूमदेव जी - पुन्हा एकदा येशील का?
बाबा जुमदेव जी तू पुन्हा एकदा, जन्म घेवूनी येशील का?
तू दिलेल्या शिकवणी ह्या, समाजाला पुन्हा देशील का ?
धर्म नाशला,माणुसकी हरपली या जगात,
माणुसकीचा धडा शिकवायला पुन्हा येशील का?
छेतीस कोटी देवताचे पूजनात लागला हा मानव,
पण माणुसकी कोणातच नाही, जाब तयांचा घेशील का?
हा माझा तो माझा ईश्वराच्या नावाने लढती सारे,
मात्र परमात्मा एक आहे, अशी सुबुद्धी त्यांना देशील का?
दगडात देव शोधूनी थकशिल तू मानवा,
तुझ्याच पाशी तूच आहेस, हे सत्य दर्शविण्या येशील का?
नाती- गोती सारे दुरावले फक्त स्वार्थ आपला ही साधती,
हा स्वार्थ दूर करण्यास ह्या, समाजात पुन्हा येशील का?
घर- दार, कुटुंब, समाज पुन्हा प्रेममय होईल का?
सुख, शांती समाजात पसरूवनी,प्रेम दाखला देशील का?
माझा माझा करुनी अर्जुन आजचा, बघ कुरुक्षेत्र घडवितो,
नको ते महाभारत, हे गीत गाण्या येशील का?
भाव ह्या विनोद च्या मनातले समजले नाही कुणाले
हा मर्म सांगण्यास जुमदेव जी, पुन्हा एकदा येशील का?
