STORYMIRROR

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

रयतेचा राजा

रयतेचा राजा

1 min
240

खरा आई तुळजाभवानी चा भक्त हवा आहे

होय समाजाला आई जिजाऊ चा सिंहासारखा लेक हवा आहे


मत घेऊन संसदेत बसून खुर्ची मोडणारा नेता नाही

तर शिवाजी सारखा रयतेचा विश्वासू राजा हवा आहे


शिवाजीच्या नावावर राजकारण करणारा नाही

तर समाजाला दिशा देणारा खरा छत्रपती हवा आहे


मेल्यावर पुसणारा कोणी नसणार असा सत्ताधारी नाही

तर स्वर्गात देवांनी पाहून मुजरा करावा असा एक "मर्द मराठा शिवबा" हवा आहे


शिवाजींच्या नावावर तडजोड करणारा नाही

तर स्वाभिमान जपणारा खरा शिवरायांचा मावळा हवा आहे


बलवानासमोर मान झुकवून उभा दुबळा मावळा नाही

तर सागरी लाटा उसळविणारा खरा शिवरायांचा भक्त हवा आहे


स्वतंत्र असुनी पारतंत्र्यात राहणाऱ्या ह्या मावळ्याला

खरंच छत्रपती शिवरायांसारखा रयतेचा राजा हवा आहे 


Rate this content
Log in