Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

रानमेवा

रानमेवा

1 min
128


पक्षी विचारी मानवाला

तो माझा संसार कुठं आहे ?

झाडे, पशु- पक्षी, पर्वत तो रान

तो माझा घरदार कुठं आहे ?


देत होती फळे आणि फुले

तो रान आज कुठं आहे ?

कापुनी रान सारे माणुसकी हरविलं

ती माणूसकी आज कुठं आहे ?


सांग ना रे माणसा

कुठं सजवू आपलं घरटं ?

कोणत्या रानात आपलं संसार नांदवावं

तुझ्यापासुनी आपलं घरटं कसं वाचवावं ?


फळे-फुले, अन्न, वस्त्र देते हे रान

हवा शुद्ध करुनी, आक्सिजन देते हे रान

पशु-पक्षी, प्राणी सर्वांना देते घर हे रान

माणसा सांग ना रे मग का कापतोस हे रान ?


देती नव-नवीन कपडे

नग्न अंगाला झाकती तू रे मानवा

देती निरनिराळी औषधी

बिमारी ला हरवितोस तू रे मानवा

देती ती नव-नवीन पुस्तके

वाचुनी होशील तू विद्वान

माणसा सांग ना रे तरी का कापतोस हे रान ?


गेलं होतं मी तुझ्या त्या स्वप्नाच्या शहरात

तो तर पूर्ण विराण आहे

दूर दूर नाही रान नाही घर

सांग ना रे ते माझे संसार कुठं आहे ?


Rate this content
Log in