STORYMIRROR

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
131

बा शेतकरीच्या मालाची

भर चौकात कमी दरात उचल झाली 

अवघ्या गल्लीत संतापाची 

तुफान लाट उसळली 


शेतकऱ्यांच्या कष्टाच्या लढ्याची

ज्योत सर्वत्र पेटली

गल्ली बोळातून शेतकरी

वाघापरी तुटून उठली


जमुनी सारे शेतकरी

न्याय मागू लागली

नेतागिरी कुत्रे शेतकऱ्यांवर 

जनावरागत तुटून पडली 


भडवे नेतागिरी सैतानांनी बेछूट 

बंदुकीची गोळी झाडली

जय जवान, जय किसान नारा देत कित्येक

शेतकरी मृत्यूमुखी पडली


शेतकऱ्यांवर लाठी काठी

चौफेर बरसली 

नेतागीरीला कलंकित झालेल्या

नामर्दांनी अश्रूधारेचे नळभांडे फोडली 


कुणाची हात मोडली

कुणाची पाय मोडली

कुणाची डोके फोडली

शेतकरी सारी रक्तबंबाळ झाली


कित्येक शेतकऱ्यांच्या रक्ताची

पाट वाहली

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी 

आक्रोशाची टाहो फोडली


गोळी घालणारे भडवे 

मोकाट सुटली

मात्र, कुणालाही शेतकऱ्यांची 

दया, माया नाही आली


सारे भारतीय माझे बांधव 

जय जवान, जय किसान

म्हणणारे शब्द

फक्त पुस्तकापुरती राहिली


Rate this content
Log in