Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

*जगाचा पोशिंदा - नको मला वेतन वा पेन्शन*

*जगाचा पोशिंदा - नको मला वेतन वा पेन्शन*

1 min
199

लाखों पगार घेऊनी ही 

जूनी पेंशनसाठी नौकरी करणारे रस्त्यावर *पाहिली*

माझ्या शेतकरी राजाने मात्र घरात

दोन वाटणी केली भाकर *पाहिली* !१!

आमदार दोन मिनीटांत पेंशन घेऊन *गेला*,

आता या नौकरी वाल्यांचा पेंशन ओझा *पेला*,

ओझा पेलून पेलून माझा जगाचा पोशिंदा

मात्र झाडावर लटकून *मेला* !२!

नौकरी करणाऱ्यांची पोरं, 

खाजगी शाळेत शिकतांना *पाहिली*,

माञ माझ्या शेतकऱ्याच्या घरातील पोरं 

जिल्हा परिषद शाळेत *पाहिली* !३!

तुम्ही आहात पेन्शनच्या नादात *मस्त*,

माझ्या शेतकरीचे पोरं 

गरिबीच्या रोगाने *ग्रस्त*!४!

तुम्ही जुनी पेन्शनची करता मागणी

लाखों पैश्याची भविष्यात कराल *जोडणी* ,

मात्र महावितरण करत राहील 

शेतकऱ्यांची शेतीची विज *तोडणी*!५!

माझा शेतकरी बाप वावरात उभ्या ऊन्हात *झोपला* 

शेतकरी बापावर मात्र पाऊस *कोपला*!६!

उभ्या ऊन्हात हा काढतो *घाम*,

मग द्या शेतकऱ्याला 

ह्या नौकरी वाल्या सारखा *दाम* !६!

नका देऊ वेतन, नका देऊ पेन्शन *शेतकऱ्यांला*

फक्त कर्जमाफी द्या माझ्या जगाच्या ह्या *पोशिंद्याला*

Rate this content
Log in