STORYMIRROR

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

बाप

बाप

1 min
6

अपरिमित कष्ट करणारं शरीर असतो 

अपरिमित काळजी करणारं मन असतो 

स्वत:च्या इच्छा बाजूला सारतो

बाळासाठी झटणारं अंत:करण असतो

-----------------------तोच खरा बाप असतो !

संसाराचा गाडा ओढण्यास घाम गाळतो 

आयुष्यात लेकराचं चुका सावरतो 

लेकरांच्या सुखासाठी देह अर्पण करतो

स्वत: पेक्षा लेकरांवर प्रेम करतो

-----------------------तोच खरा बाप असतो !

आयुष्यात लेकरांना शब्दांचा अर्थ समजावतो 

लेकरांस स्वातंत्र देऊनी खरी वृत्ति शिकवतो

जिंकण्यासाठी खऱ्या नीतीची शिकवण देतो

लेकरांसाठी मिन-मिनत्या दिव्यासारखा जळतो 

-----------------------तोच खरा बाप असतो !

फाटका धोतर घालून शेतात राब-राब राबतो

मात्र बाळाला चांगल्या शाळेत शिकवितो

हातात फाटकी पिशवी घेऊन बाजारात फिरतो

बाळाला मात्र शाळेसाठी सुंदर पिशवी देतो

-----------------------तोच खरा बाप असतो !

कुटुंबात आधारस्तंभ सारखा ठाम उभा असतो

लेकरांच्या आयुष्यभरच साथ असतो

मार्गदर्शनांस खंबीरतेने हात असतो

खऱ्या अर्थाने कुटुंबाचा साथ असतो

-----------------------तोच खरा बाप असतो !

लेकीच्या लग्नांत कोपऱ्यात रडणारा तो

प्रेम, वात्सल्य, करुणा, दयेचा सागर असतो

माझ्या लेकीला खुश ठेवा म्हणत 

सगळ्या सोयरीला हाथ जोडतो

-----------------------तोच खरा बाप असतो !

आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा असतो

कुटुंबाचा धीर, सांत्वन, आधार देण्याचा भार झेलतो

बाळाला शिकविण्यासाठी सावकारांचा बोझा पेलतो

वेळ पडली तर हातपाय पडतो

-----------------------तोच खरा बाप असतो !

घरातील एक अनमोल पुरुष असतो 

ढाल बनुनी दारात उभा राहतो

उसळलेल्या कबड्डीत रक्त वाहिले बाळाचे

तवा मन- मनात कोपऱ्यात रडतो

-----------------------तोच खरा बाप असतो !

Rate this content
Log in