STORYMIRROR

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

संत रविदासांची ऐका कथा

संत रविदासांची ऐका कथा

1 min
123

माता घुरबिनिया बाळाची आई

रघुराम हो ss पिता

हो ss संत रविदासांची ऐका कथा !!धृ !!


करू प्रणाम आधी या धरणीला 

देऊ मान दुजा या चमार जातीला

भिडली जी अखंड संकटाच्या छातीला

विसरू कसा ह्या माझ्या जातीला


असा हा संत रविदास 

वाराणसी जवळील सीर गोवरधनपूर गावात जन्माला

हो ss संत रविदासांची ऐका कथा !!१!!


सन तेरा सौ अठ्ठ्यान्नव शुभ ठरणारा 

आला हो ss गुरु मंत्र देणारा

फेब्रुवारी सोळा उगवताच उगवला तारा

लाभला चमार जातीला नव्या युगाचा तारा 


झाला हर्ष फुला हर्षल्या लता ss

हो ss संत रविदासांची ऐका कथा !!२!!


रविदास नामकरण बाळाचा झाला

तोच रविदास पुढे संत शिरोमणी रविदास झाला

जनता जनार्दनासाठी जीवनभर झुंजला 

संत असा नाही उभ्या धरतीवर झाला


आज आठवू या रघुराम सुता ss

हो ss संत रविदासांची ऐका कथा !!३!!


विवाह तेराव्या वर्षी लोनादेवी सोबत झाला

धन्य जीवनाला त्यांच्या साथीदार मिळाला 

गुरु रामानंदांच्या संपर्काने ज्ञानभांडार वाढला

वेद, उपनिषदे आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागला


चमार जातीत एकटा असा जन्माला

हो ss संत रविदासांची ऐका कथा !!४!!


वेद धर्म सबसे बडा अनुपम सच्चा ज्ञान !

फिर मै क्यों छोडू इसे, पढलू झुठ कुरान !

अशी प्रसिद्ध वचने त्यांची रुजली समाजात 

आजही नांदती ही वचने आमच्या मुखात 


ज्ञानाचा असा हा महान दाता

हो ss संत रविदासांची ऐका कथा !!५!!


दाखवितो गुरु रविदास आयुष्याची वाट 

गुरुविण अवघड आहे डोंगर-घाट 

आयुष्य असतो सुख दुःखाची चाल 

संत रविदासा तूच आहेस माझी ढाल 


आज आठवू या रघुराम सुता ss

हो ss संत रविदासांची ऐका कथा !!६!!



Rate this content
Log in