सखा माझा चिमणा
सखा माझा चिमणा
एक चिमणी
टकमक पाहात होती
हळुहळू घरात येत होती
तिला म्हटले
लांबून काय बघतेस
दाणे खायला मागतेस
बघ त्या झाडाखाली
भरपूर दाणे टाकलेत
पोटभर खाऊन घे
संपले की मागून घे
चिमणी रडायला लागली
दाणे टिपून
पंखात भरायला लागली
घरी माझा सखा चिमणाही आहे
पाय त्याचा मोडला आहे
तो उडू शकत नाही
त्याला उपाशी राहिलेलं
मी पाहू शकत नाही
आधी मी त्याला
पोटभर खाऊ घालणार
त्याच्याशिवाय माझं
पोट नाही भरणार
त्याचं पोट भरलं की
माझ्या पंखात बळ येते
म्हणून त्याच्यासाठी
दाणे टिपायला
मी रोज नवीन घर शोधते
सखा माझा
आनंदात दिसल्यावर
त्याच्या कुशीत विसावते
त्याच्या सुखातच
मी माझं सुख बघते

