श्वास तू
श्वास तू
श्वास तू ध्यास तू
आंतरीक ही आस तू
जीवन तू जीवनातील उमंग तू
ओढ तू प्रीत तू महामंगल गीत तू
तू कविता तू हृदयातील प्रेमगीत तू
माया तू ममता तू
जाणीवेतील प्राण तू
स्वप्न तू सत्य तू
यज्ञातील शिव तू
शांत तू मोह तू
शितल अशी छाया तू
तुझ्या माझ्या नात्यातील
अमीट असे शिल्प तू
व्यक्त मी अव्यक्त तू ,
ध्यास तू, आणि श्वास ही तूच

