STORYMIRROR

balkavi balkavi

Classics

2  

balkavi balkavi

Classics

शून्य मनाचा घुमट

शून्य मनाचा घुमट

1 min
14K


शून्य मनाच्या घुमटांत

कसलें तरि घुमते गीत;

अर्थ कळेना कसलाही,

विश्रांती परि त्या नाहीं;

वारा वाही,

निर्झर गाई,

मर्मर होई.


परि त्याचे भीषण भूत

घोंघावत फिरते येथ.

दिव्यरूपिणी सृष्टी जरी

भीषण रूपा एथ धरी;

जग सगळे भीषण होते

नांदाया मग ये येथे;

न कळे असला,

घुमट बनविला,

कुणीं कशाला?--



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics