STORYMIRROR

balkavi balkavi

Others

3  

balkavi balkavi

Others

सौंदर्याचा अभ्यास कर!

सौंदर्याचा अभ्यास कर!

1 min
14.8K


गाणे हे रचिले असे जुळवुनी कोठून काहीतरी,

वाणी सत्य तुझी असेल भरली द्वेषानलाने जरी;

रम्याकार चमत्कृतिप्रचुर हे ब्रह्मांड नेत्री दिसे.

खेळे काहीतरी तयांतुनि, मनी गाणे तदा होतसे.


सूर्याची किरणे, सुनिर्मल तशा त्या तारकामालिका,

संध्येचे रमणीय रंग, उदयी सृष्टी मनोहारिका,

वृक्ष श्यामल पुष्पसंकुल चलद्‍दूर्वादलाच्छादिता,

वाहे शांतपथा सुरम्य सरिता कल्लोलमालायुता;


प्रेमाने अभिषिक्त चित्र मग त्या रामण्यविश्वी दिसे;

चित्ताची रमणीयता उतरुनी संगीत होते तसें

ते सौंदर्यच आणीले जुळवुनी कोठून काहीतरी.

तूंते ते न दिसे म्हणून सखया अभ्यास याचा करी.


Rate this content
Log in