STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शुभेच्छांची काव्यसुमने

शुभेच्छांची काव्यसुमने

1 min
219

कार्य आपुले थोरच

अल्पवयी भरारीत

व्याप्ती बहुत कार्याची

अती उच्च पातळीत


संस्था गृहउद्योगाची

स्त्रीकल्याणास्तव सुरु

नित्य मनोमनी असे

समाजसेवेचे तारु


अन्यायाची चीड मनी

विकासाची उरी आस

दोडामार्ग एक्सप्रेस

वृत्तपत्र काढी खास


नवोदित कवींसाठी

नव मंचाची स्थापना

मानवंदना कर्तृत्वा

अल्प ही यत्नसाधना


लाभो दीर्घायुष्यासह

सदा सुख समाधान

लाभो यश किर्तीसह

विनायक वरदान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract