श्रृंगाराची नशा
श्रृंगाराची नशा
सख्या फसले प्रेमात
लक्ष लागेना कामात
मद्याविणा माझी काया धूंदावली
कशी ही श्रृंगाराची नशा भिनली...
डोळी कशी ही मादक अदा
तुम्हावर झाले मी हो फिदा
ज्वानीने भरली ज्वाला राया
मिठी ही कशी उबदार सदा...
ठासून भरली तारुण्याची प्याली...
कशी ही श्रृंगाराची नशा भिनली...
तुझ्या प्रेमात आहे मी फिदा
भरला नजरेत हा नशा
प्रितीचा रे सुखद गारवा
झाला राया इष्काचा मारवा...
झिंगल्यावाणी माझी अवस्था झाली...
अशी ही श्रृंगाराची नशा भिनली...
रुप लावण्याची सळसळ ज्वानी
लाजूनीया होते जलापरी पानी
तुमच्या हृदयातली राणी राया
देते मृगकणी मनभर माया...
मद्याविणा कशी ही धूंदी चढली...
अशी ही श्रृंगाराची नशा भिनली...
स्वप्न परी आले मी देखणी
भाग्याने तुमची प्रेम दिवाणी
मंदमती झाली माझी मती
सांभाळू ज्वानीचा भार किती...
अहो राया मी रातभर जागली...
अशी ही श्रृंगाराची नशा भिनली...

