STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

श्रमदान सर्वात श्रेष्ठ दान

श्रमदान सर्वात श्रेष्ठ दान

1 min
205

पाणी फाउंडशनने कमाल केली 

दुष्काळावर त्यांनी मात केली 

प्राण जीवांचे त्यांनी वाचविले

भारतमातेला महान पुत्र लाभले  


 निस्वार्थ सेवा अखंड त्यांची  

 जिद्द, चिकाटी त्यांच्या मनाची  

 शिकवण त्यांची श्रमदानाची 

 उत्तुंग शिखरे अखंड यशाची 

 सेवा करतात मानवी जीवाची 

 

  पाणी फाउंडेशनने चेतना जागविली 

  सर्वांना कष्टाची प्रेरणा मिळाली 

  सहकार्याची भावना रुजविली 

   लहान थोरांची जोड मिळाली  


एकत्र आले कायम एकजुटीने 

पाण्याच्या महान शोध कार्याने

सफल झाले प्रयत्न गावकऱ्यांचे 

तलाव जलमय झाले गावांचे  


  हिरवीगार खेडी सुंदर बनली 

  योजना खरोखर साकार झाली 

  सुख समृद्ध सर्व खेडी नांदली 

  श्रमदानाने आधुनिक किमया केली  


दोन हातांना काम दुष्काळात मिळाले  

सुखी संसार त्यांनी मानवाचे केले

दुष्काळात आधार पाणी फाउंडेशन झाले 

दुःख सारे त्यांचे संपविण्यास सरसावले


   श्रमदानाने पाणी शेतात जिरले 

   स्वप्न सत्यात त्यांनी आणले 

   मुक्या प्राण्यांचे जीव वाचले

    पुण्य त्यांचे कुटुंबास लाभले 


बंधुभाव प्रेम आम्ही त्यातून शिकलो 

अश्रु गरीबांचे पुसण्यास धावलो

दुःख गरीबांचे संपविण्यास निघालो

नवा आनंद देण्याला पाणी फाउंडेशन स्थापन झाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational