श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ । कृपेची माऊली ।
भक्तांची सावली । कृपासिंधू ।। १ ।।
जय जय स्वामी । करितो वंदन ।
स्पर्शितो चरण । स्वामीराया ।।२ ।।
ऊँःनमो समर्था। ते नामस्मरण ।
दुःख निवारण । पिडितांचे।। ३ ।।
स्वामी माझी माय । करितो भजन ।
वदतो किर्तन । गुणगाया ।।४ ।।
नाम मुखी घेता । चिंता दुःख हारी ।
सकलांना तारी । माय माझी ।।५ ।।
स्वामी समर्थांचा । आरती सोहळा ।
रम्य गोतावळा । भावस्पर्शी ।। ६ ।।
जसा भाव मनी । तशी स्वामी कृपा
मिळे गुरूकृपा । भक्तजना ।।७ ।।