STORYMIRROR

Anagha Kamat

Abstract

3  

Anagha Kamat

Abstract

श्री कामाक्षी देवी

श्री कामाक्षी देवी

1 min
169

श्री कामाक्षी देवी करतो भावे 

तुजला मी साष्टांग नमस्कार 

तुझ्या कृपेने कर तूं देवी 

चांगला असा चमत्कार 


हजारो भाविक तुझ्याकडे 

तुला नमस्कार करायला 

अमावास्येच्या खास दिवशी 

येतात तुला भेटायला 


मागण्या त्यांच्या होतात पूर्ण 

काढतात ते पाच प्रदक्षिणा 

मनोभावे तुझी सेवा करून 

देतात ते भक्तीने दान दक्षिणा 


महाप्रसादाचा लाभ घ्यावा म्हणून 

ओळीने एका उभे राहातात 

शिस्तीने तिर्थप्रसाद घेऊन 

भक्तीभावाने ते खातात 


कामाक्षीआईची कृपा अपरंपार 

हे माहीत झाले जनांना 

जेव्हां जेव्हां धार्मिक विधी 

तेव्हां होते गर्दी पर्वांना 


प्रसन्न हो हे देवी कामाक्षी 

ठेव अशीच कृपा पामरांवर 

तूच अमुची आहेस आई 

सारी भिस्तच तुझ्यावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract