श्री हरी विठ्ठल
श्री हरी विठ्ठल
करीता गजर
विठूरायाचा
शुद्ध होय काया
मन वाचा!
पळोनि जाती
मनाचे विकार
भक्तिरसे मन
भरुनी जाई!
दिसे ठायी ठायी
माऊली विठाई
देह भान
हारपोनी जाई !
एकचित्त एकरुप
ध्यानी मनी एक
एकलेपणाही
विरोनी जाई !
पांडुरंग ध्यानी
पांडुरंग मनी
पांडुरंग जनी
दाटियेला !