शरदाचे चांदणे
शरदाचे चांदणे
कुष्ठरोगाची बाधा झाली
झाले जीवन लाजीरवाणे
भितीमुळे जनांच्या
नशिबी आले
कुढत कुढत जगणे
जिव्हारी लागल्या नजरा
लोकांचे आपसात कुजबुजने
पाप शाप रे यास लागले
पुर्वजन्मीचे भोगणे
देवूनी आरोग्य शिक्षण यांना
करा जरा शहाणे
अंधश्रद्धा अज्ञान जाता
जीवन होई शरदाचे चांदणे
शरदाचे चांदणे .
