STORYMIRROR

balkavi balkavi

Classics Fantasy

0  

balkavi balkavi

Classics Fantasy

श्रावणमासी हर्ष मानसी

श्रावणमासी हर्ष मानसी

1 min
1.0K


श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे !


वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !


झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा,

तो उघडे तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे !


उठता वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा;

सर्व नभावर होय रेखिल सुंदरतेचे रूप महा !


बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,

उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते !


फडफड करून भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;

सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती !


खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे,

मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरे !


सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला,

पारिजातही बघता भामा, रोष मनीचा मावळला !


सुंदर परडी घेऊनि हाती पुरपकंठी शुद्धमती,

सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले-पत्री खुडती !


देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात,

वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics