STORYMIRROR

Mangesh Medhi

Drama

2  

Mangesh Medhi

Drama

श्रावण सांज

श्रावण सांज

1 min
2.9K


शितल शितल मोहक हिरवळ

त्यावर कोवळ्या उन्हाची तिरीप

कुंद वाऱ्यासवे मुग्ध सुगंध

पाखरे करिती मंजुळ साथ

प्रेमात नारंगी रंगे जलाशय

प्रसन्न आनंदी श्रावण सांज

शितल शितल....


हर्ष सोहळी या तिच्या समेत

बेहोश व्हावे प्रेम नशेत

डाळींबी ओठांनी कानी गूंजन

गहिऱ्या लोचनी मदहोश बंधन

शितल शितल....


संधी प्रकाशी सुवर्ण तेज

खुलावा मुखी प्रेम मोहर

दिसावे ओठी स्मित मधुर

गुलाबी खळी दोन्ही गालात

शितल शितल....


छेडती हळूच झुळूक अवखळ

नाजुक बोटांनी लाडीक सळसळ

रोमांच अंगी मनी आवेग


कर करात गुंफून बंध

सुटू नये कधी हा प्रेम छंद


शितल शितल मोहक हिरवळ

त्यावर कोवळ्या ऊन्हाची तिरीप

प्रसन्न आनंदी श्रावण सांज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama