STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

शोकांतिका

शोकांतिका

1 min
467

कधी होतीस तूच माझ्या, कोऱ्या कागदावरची कथा

अन तूच होतीस माझ्या, मनावर रेखाटलेली कविता


होते माझ्याही मनाला कधी, तुझेच फक्त छंद

आयुष्य बनले होते माझे, तुझ्या श्वासातले गंध


माझ्या आयुष्यातली प्रत्येक सांज, तुझ्या आठवणीत बुडायची

तू नसायचीस कधीच भावविश्वात माझ्या, ही खंत मागे उरायची


थंड रात्रीच्या वाऱ्यासवे मी, तुझ्या स्वप्नी स्वार व्हायचो

तुझ्यावर गीते लिहिता लिहिता एक क्षण गुलजार व्हायचो


स्वप्नातच काय आजवर, माझ्या श्वासातही तूच होतीस

मनातल्या मौनाला तुझ्या सांग, माझ्या हृदयातही फक्त तूच होतीस


आठवणींच्या भिंतीवर आपल्या,काळोखाचे पडदे सरकले

तुझ्या आभासांवरचे आयुष्य माझे, तुझ्या विरहात अडकले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance