शोध स्वत:चा
शोध स्वत:चा
नको घेऊस या जगी
तू आधार रे कुणाचा
प्रश्न समोर ठाकला
तुझ्या उभ्या अस्तित्वाचा ||१||
खूप झालं तुझं आता
क्षणा क्षणाला रडणं
हात पाय पकडून
मदतीसाठी झुरण ||२||
उठ आणि रहा उभा
हिमतीच्या जोरावर
कर कष्ट असे जणू
मिळे यश तीरावर ||३||
स्वाभिमानाने स्वीकार
खंबीरपणाचे जगणे
आयुष्याला देईल हे
कमालीचे बहरणे ||४||
दर्पणात प्रतिबिंब
दिसे तुझ्या क्षमतेचे
नजरेत रोज येते
आव्हान शोध घेण्याचे ||५||