STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

शक्तपीठे

शक्तपीठे

1 min
462

नवरात्री उत्सवात

आदिशक्ती आदिमाया 

साडे तीन शक्तिपीठे

ओटी भरा तुम्ही बाया.


कोल्हापूरी अंबाबाई

महालक्ष्मी आदिमाया

सुहासिनी भरा ओटी

आहे तिची भक्ता छाया.


माहूरगडची राणी

भक्तासाठी पाठीराखी

देवीमाता ती रेणुका

धावे सदा भक्ता हाकी.


तुळजापूरचे क्षेत्र

भवानीचे गुणगान

शिवराया महाराजे

दिले देवी श्रेष्ठ स्थान.


नाशिकच्या गडावरी

देवी सप्तशृंगी आई

अर्ध शक्तिपीठ आस

भगिनीना तिथे घाई.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational