STORYMIRROR

Sanjay Pande

Tragedy

4  

Sanjay Pande

Tragedy

शहीदाच्या मुलाची कविता

शहीदाच्या मुलाची कविता

1 min
519


कालच तर आपले बाबा

झाले होते ना हो बोलणे

वाढदिवसाला येण्याचे

तुम्ही होतात न म्हणाला।।


किती केली होती मी तयारी 

तुम्ही येणार आहात म्हणून

किती आंनद झाला होता

माझ्या या बाल मनाला।।


पोलिसांची पोर म्हणून

किती मला मिळतो मान

बाबा अभिमान वाटतो

आपला प्रत्येक क्षणाला।।


शाळेत पालक सभेला ही

नेहमी आईच तर यायची

तुमची कमी भासायची 

पण आवरायचो मी मनाला।।


असो दिवाळी अथवा दसरा

बाबा बाहेरगावी असायचे

आम्ही घरी वाट पाहायचो

तुम्ही याल म्हणून सनाला।।


बाबा,केक चा ही ऑर्डर

दिला होता न हो आईने

तितक्यात तुम्ही लावले

बाबा आपले प्राण पणाला।।

  

कधी मनसोक्त नाही खेळलो

बाबा तुमच्या अंगा खांद्यावर

माझ्यावरच आली की पाळी

अग्नी द्यायची तुमच्या तनाला।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy