शहीद
शहीद
काळ्या आईचा रे श्वास,
तुझा जगण्या आधार।
जीवाचा रे पाठीराखा,
किती सोसलास भार।
धरीत्रीचा रे पुत्र तू,
तुझं सीमेवर होतं गाव,
वंदे मातरम ! कोरलं होतंस का?,
तुझ्या छातीवर नाव।
हृदय भरून येत बघूनी,
तुझी बायको-लेकरं।
काळजात वाघिणीच्या शोधतात,
सुखं चिमणी पाखरं।
दिसते जेव्हा कधी मला,
वासरासाठी हंबरणारी गाय।
डोळ्यासमोर येते माझ्या,
तुझी झुरणारी माय।
कंठ दाटून येतो दिपूनी,
देहावरील तिरंग्याची शान।
वाहते आसवांची रे सलामी,
माझ्या लाडक्या जवान।
।जय हिंद।