पावसा
पावसा
किती बरे झाले असते, जर तू त्या दिवशी आला नसतास,
न झाले असते प्रेम, न झालाअसता प्रेमभंग।
अचानक...
तू अडवलेल्या वाटेत, तो धावून आला,
आणि का कुणास ठाऊक, प्रेमाचा मोह आवरेना।
तू तर जोरदार हजेरी लावून निघून गेलास,
पण वादळापूर्वीची शांतता, नशिबी देऊन गेलास।
खरंय म्हणा,
प्रेमाचा स्पर्शही, तुझ्या अस्तित्वाएवढाच,
कधी महापूर तर कधी भयंकर दुष्काळ।
क्षणिक सुखाचे वेड लावणारा, तू किमयागार,
वाचलो तर वाचलो, नाहीतर आयुष्यभर भार।
नकोच रे,
ते पहिल्या पावसातलं आंधळं प्रेम, अन् ती प्रेमाची काल्पनिक गाणी,
सत्य मात्र अवघड असतं, तिथे नसते रे मनमानी।
किती बरे झाले असते...