जाग यावी
जाग यावी
आज हे सारे पाहून, स्वप्न असावे वाटते मला,
डोळे उघडावे ताडकन, अन सारे दुःख विरून जावे।
कधी न केली कल्पना ही, का बरे हे असे व्हावे,
उत्तर न ठाऊक कुणासही, कधी हे संपणार आहे।
वर्तमान हा असा, जणू गोंधळाचा पसारा,
भविष्य तर एक कठीण चक्रव्यूह, सुटका कधी होणार आहे।
चालत्या बोलत्या बाहुल्यांचा, का असा प्रवास थांबला,
सुखी स्वप्न रंगवणाऱ्या, का या ज्योती विझत गेल्या।
यावे कुणीतरी आणि सांगावे, काय पुढे होणार आहे,
नाहीतर जाग यावी पटकन, अन हे एक स्वप्न असावे।