शेतकरी
शेतकरी
माझ्या शेतकरी राजाचे डोळे पाणावलले
आकाशाकडे पाहून हात जोडले पावसाला
येऊ दे, येऊ दे सरीवर सरी जोराने धरतीवर
होइल किती आनंद आपल्या तापलेल्या धरणीला
मायलेकरांना होईल आनंद, नाचतील पावसाच्या संगे
चिमण्या पाखरे भिजतील तुझ्यासंगे पुन्हा मन भरून
सार्या आकाशात घालतील घिरट्या पुन्हा येतील धरतीवर
येतील निरोप घेऊन पाऊसाचे, थोर गोडवे गाऊन
माझा शेतकरी राजा पाहील स्वप्न हिरव्या सृष्टीचे
मिळेल जगण्याला आधार, सेवा धरतीची करण्याला
काळ्या मातीत सापडते धन, कष्टाच्या हिमतीवर
उमेद आहे जगण्याची, काळी माती त्याच्या आधाराला
नको लई पैसा पाणी फिटू दे मोल सालाच्या कष्टाचे
मिटेल जगण्याची चिंता, जेव्हा काम मिळेल हाताला
दिवस रात राबतो, करतो कायम जगाचा विचार
हिरवे पीक त्याची धनदौलत तोच आनंद जगण्याला
जगानेही करावा विचार त्याच्या संवेदनशील मनाचा
नका करू कधी विचार मातीमोल भाव करण्याचा
तोच आहे शेवटी आधार आपल्या नेहमी जगण्याला
करू या विचार त्याच्या कष्टाचा, देऊ मोबदला घामाचा.
थोडे मन करा रे हळवे शेतकरी बांधवांसाठी
त्यांचे भले करण्याला, यारे आपण सारे जन
व्हावा विचार त्यांच्या लेकरांचा पुन्हा जगण्याला
नको फसवी आशा, लाभ नको फसवे आश्वासन
