STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational Others

3  

VINAYAK PATIL

Inspirational Others

शेती

शेती

1 min
216

कष्ट करूनी शेतात 

पिक येई मौल्यवान 

म्हणूनच तर होईल 

शेतकरी माझा महान 


घन ओथंबूनी आले 

पाखरे घालती शीळ 

स्वप्न आहे डोळ्यातुनी 

हातावरी पाहतो तीळ 


घामाच्या वाहूनी धारा 

कष्टाच्या कळा सोसल्या 

शेती सारी फुलवितो

हाती सुरुकुत्या पडल्या 


शेतात राबताना पहा 

विसरूनी जातो भान 

पाहताक्षणी मज वाटे 

मांडे विठू चरणी ध्यान 


निसर्ग देवते तुजला 

मागणे घालतो एकच 

फुलू दे माझे शिवार 

सारे जग माझे विश्वच   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational