शब्दपूजा
शब्दपूजा
होई शब्दांचीच पूजा
आहे साहित्य पंढरी
शब्दसेतू परिवार
पूजा शब्दांचीच करी
आम्ही वारकरी सारे
कथा कविता करतो.
शब्द शब्दांनीच रोज
शब्दसेतू हा बांधतो.
नाही भेदभाव येथे
आहे प्रेमाची सावली.
होतो शब्दांचा सन्मान
येथे पावलो पावली.
नाही कशाचीच हाव
आहे शब्दच संपत्ती.
नाही कशाचाच धाक
येथे कुठेही विपत्ती.
चाले शब्दांचा जागर
नित्य न पडता खंड.
आहे शब्दच विठ्ठल
जप शब्दांचा अखंड.