विषय :- स्त्री शक्ती
विषय :- स्त्री शक्ती
रूपे तुझी आहेत किती
तूच ओळख तुझी खरी शक्ति
तूच माता तूच भगिनी
तूच अन्नपूर्णा सहचारिणी
घर सांभाळणारी गृहिणी
तुझ्या रूपाची तूच स्वामिनी
मानाने जगणारी मानिनी
रंणांगणावरची रणरागिणी
नाही या विविध रूपाची गणती
तूच ओळख तुझी खरी शक्ति
अबला नाही सबला आहेस तू
अन्यायाविरुद्ध पेटून उठ तू
ओळख तुझ्यातल्याच गुणांना तू
मग गवसेल तुला तुझ्यातलीच तू
होउ दे तुझ्या अस्तित्वाची ओळख ती
तूच ओळख तुझी खरी शक्ति
तूच दुर्गा तूच पार्वती
तूच लक्ष्मी तूच सरस्वती
तूच आदिमाया आदिशक्ती
मग कशाची तुला ही भिती
तूच ओळख तुझी खरी शक्ति
बाहेर पड चाकोरीतून
दे झुगारून अनाठायी बंधन
दाखव कार्यक्षमता हिमतीन
अन खेचून आण यश जिद्दीनं
अन् कवेत घे अवघे गगन
कर स्वसंरक्षण धाडसान
नको सहन करू अन्याय अपमान
चहूकडे पोहोचू दे तुझ्या कार्याची किर्ती
तूच ओळख तुझी खरी शक्ती
