भारतमातेची पुण्याई
भारतमातेची पुण्याई
ज्यांनी शिवबा घडविला
त्या आपल्या राजमाता जिजाबाई
ताटीचे अभंग लिहिले तिने
ती ज्ञानोबांची लाडकी बहिण मुक्ताई
यशस्वीपणे राज्यकारभार चालवला
त्या आपल्या अहिल्याबाई
बांधूनी बाळ पाठीशी इंग्रजांशी लढली
ती मर्दानी झाशीची राणी लक्ष्मीबाई
लेकींना शिकवायला जन्माला आली
ती प्रथम शिक्षका सावित्रीबाई
बोलीभाषेतून संसाराचा सार सांगणा-या
त्या कवयित्री बहिणाबाई
प्रथम महिला पंतप्रधान बनुनी
इंदिरा गांधी ती देशाचा कारभार चालवित जाई
अवकाशात अवकाश संशोधन करण्या
कल्पना चावला ती जाई
सुरेख अन सुरेल आवाजात गात
गानकोकीळा लता दीदी ओळखल्या जाई
प्रथम महिला राष्ट्रपती झाल्या
त्या आपल्या प्रतिभाताई
अनाथांची माय झाली ती
लेकरांची माई सिंधूताई
या महान स्त्रिया भारतात जन्मल्या
ती या भारतमातेची पुण्याई
या भारतमातेची पुण्याई
