करू या वंदन
करू या वंदन
आज त्या सर्वांना वंदन करू या
जे लढले देशासाठी या
वंदन करू या सर्व कोरोना योद्ध्यांना
ज्यांनी वाचविले कित्येक प्राणांना
वंदन करू या वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना
ज्यांनी वाचविले कित्येक जिवांना
वंदन करू या वर्दीतल्या माणसाला
जो अहोरात्र उभा राहिला जनसेवेला
वंदन करू या प्रत्येक सफाई कामगाराला
ज्याने स्वछतेचा जणू विडाच उचलला
वंदन करू या जीवनावश्यक वस्तू पुरविण्या-यांना
संकटं काळात अखंडितपणे सेवा पुरविना-यांना
वंदन करू या त्या सर्व स्वयंसेवकांना
त्यांनी केलेल्या सर्व मदतकार्यांना
वंदन करू या प्रशासकीय अधिकाऱ्यांना
ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले नागरीकांना
शेवटी सर्व भारतीयांनाही करूया एकदा वंदन
ज्यांनी संकटकाळी केले नियमांचे योग्य पालन
एकजुटीने संकटकाळी देशाचे झाले रक्षण
पुन्हा व्हावे आता त्याचे नंदनवन
