विठ्ठल निघाले वारीला
विठ्ठल निघाले वारीला
विठ्ठल म्हणाले रखुमाईला
यंदा भक्त नाही वारीला
हुरहुर लागली ग मनाला
ऐकुन रखुमाई म्हणली विठ्ठलाला
मग बरच आहे की नाथा
जरा विसावा घ्यावा की आता
विठ्ठल म्हणाले रखुमाईला
अग भक्त माझा असताना संकटात
मी कसे राहु इथे आरामात
मग यंदा विठ्ठलच निघाले वारीला
पाहून रखुमाई ही म्हणाली विठ्ठलाला
खर आहे नाथा जाऊ नका असे एकट्याने
अहो चला मीपण येते तुमच्या संगतीने
लगबगीने विठ्ठल निघाले रूग्णसेवेला
पाठोपाठ रखुमाईनेही पांढरा युनिफॉर्म घातला
गावोगावी चौकाचौकात वर्दीत विठ्ठल उभा राहिला
रखुमाईसंग त्याने स्वच्छतेचा विडाच उचलला
वेळोवेळी तु मदतीला धावलास स्वयंसेवक बनुन
जीवनावश्यक वस्तूही पुरवल्यास प्रत्येक ठिकाणी जाऊन
विठ्ठला किती रे ही धडपड आला नाही का थकवा
जमल्यास आतातरी घे तुही विसावा
आता फक्त तु तुझी किमया दाखव
प्रत्येक माणसामाणसात एक योध्दा जागव
कळु दे सर्वांना आयुष्याची खरी किंमत
जी इतक्या सहजासहजी नाही मिळत
विठ्ठला आता फक्त एवढीच कृपा कर
माणसातील माणुसकी जागी कर
मिटवून टाक आता जगातले सर्व संसर्ग
अन् सर्वांना सापडू दे नव्या उमेदीने जगण्याचा नवा मार्ग
