STORYMIRROR

Umendra Bisen

Classics

3  

Umendra Bisen

Classics

शब्दाची किमया

शब्दाची किमया

1 min
397

शब्द जोडती माणसे

शब्द देतीया आधार

शब्द जीवनाचे सारं

शब्द करती उध्दार.


शब्द देतात सन्मान

शब्द करी अपमान

शब्द हे वापरताना

शब्द आणतात भान.


शब्द हे हसवतात

शब्द हे रडवतात

शब्द अश्रु पुसतात

शब्द हे धीर देतात.


शब्दातून मिळे ज्ञान

शब्द पेटवीते रानं

शब्द करती कल्याण

शब्दांनाच खरे मान.


शब्द किमयाच न्यारी

शब्द जुळवीते यारी

शब्द बनवीते वैरी

शब्द माणसास तारी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics