STORYMIRROR

Sapana Thombare

Romance Others

3  

Sapana Thombare

Romance Others

शब्द तुझ्यासाठी

शब्द तुझ्यासाठी

1 min
179

नाव तुझे मेहंदीत काढूनी

 हात मेहंदीने लाल झाले

 जुळून आल्या रेशीमगाठी

 प्रेम आपले आता पूर्ण झाले

 शब्द ते माझे तुझ्यासाठी.....


 हळद लागली माझ्या अंगाला

 तुझ्याच नावाची अन रूप आले

 फुलून आले आज हृदय माझे

 नाते आपले आता पूर्ण झाले

 शब्द ते माझे तुझ्याचसाठी.....


 मांडवात लग्नाच्या अक्षदा पडल्या

 बंधन सात जन्माचे आज बंधले 

 अग्निला साक्ष घेऊनी वचन दिले 

 स्वप्न आपले आता पूर्ण झाले

 शब्द ते माझे तुझ्याचसाठी...... 


 सोडून आले ते मी माहेर नवघरी

 पाऊल नव्या आयुष्यात टाकले

 बायको बनून आली तुझीच मी  

 संसार आपले आता पूर्ण झाले

 शब्द ते माझी तुझ्याचसाठी.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance