शब्द शिल्पकार
शब्द शिल्पकार
शब्द करतात जादू
दावी तयांची कमाल
शब्द गुंफता तयार पहा सुंदरशी माळ
मनातील भाव झरे उतरती साहित्यात शोभे गद्य पद्य रुपे शब्द येती संवादात
करा मोजून मापून शब्द सदैव वापर नको फापट पसारा उगा नकोच खापर
शब्द करीतात जादु असे विचार सोबत पहा होतेची तयार छान असे मनोगत
जशा कल्पना सुचता मनी शब्द उमलता शब्द फुले पहा फुले दिसे कशी बहरता
शब्द करुनीया जादू हास्य करुण भावना भाव अद्भूत दाखवी पूर्ण होता मनो मना
