STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

4  

Umakant Kale

Tragedy

शौर्य, साहस

शौर्य, साहस

1 min
189

शौर्य, साहस


मारा तोफांचा चालू रे

लपवून तो बसला..

घात करून पाहे,मी

ठार करेल शत्रूला..


रात्र ही अंधारलेली

उंचावर दडलेला..

लढा मी देईल असा

नाही घाबरत त्याला ..


पुढे जाता गोळी लागे

धारातीर्थी झाले सारे..

रक्त शुद्ध , धरतीला

करे वंदन ती सारे...


बोले बंदुक ही माझी

रक्त सळसळ माझे..

नाही हटणार मागे

जरी गेले प्राण माझे..


जाता पुढे केला हल्ला

एक एक मी ठोकला..

साथी तुझा रे बदला 

बघ आता मी घेतला..


भ्याड त्याने घात केला

मला मागून घेरला

कसा मिळे वेळ सख्या

एका गोळूनी चिरला ..


रक्त काळजाचे माझ्या

धारा ही वाहू लागल्या..

आता तर सावल्याही

हरवून अशा गेल्या...


कर मला माफ सखे

आज चाललो सोडूनी...

ऋण आईचे मी आज

जातो आहे गं फेडूनी..


दोषी आता सदा तुझा 

नाही शौर्य केले कमी..

येई पुन्हा लढण्यास

देतो पुन्हा मी गं हमी...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy