STORYMIRROR

Abhijit Nagle

Romance

2  

Abhijit Nagle

Romance

शांतता समरातली

शांतता समरातली

1 min
2.7K


खेळलो बाजी कधी ना, चौकटीच्या आतली

बघ पणाला लावली मी, शांतता समरातली

ना कुणाशी वैर आणिक, ना सलोखाही तिचा

ही कशी आहे निरसता, पेटत्या सरणातली

सैनिकाने बंदुकीशी सात फेरे घेतले

जिंदगी आहे कहाणी कोणत्या वचनातली ?

मी फुलांचा शोध जेंव्हा, घेत होतो जीवना

हिंस्त्र काही श्वापदे मज भेटली माझ्यातली

चार पेल्यांनी कुठे मी झिंगलो होतो सखे ?

झिंगण्या होती पुरेसी वेदना ह्रदयातली !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance