STORYMIRROR

Abhijit Nagle

Tragedy

2  

Abhijit Nagle

Tragedy

माणसे !

माणसे !

1 min
2.4K


काळजाला बोचती ही माणसे

हाय काटेरी किती ही माणसे

गाय बैलांची पूजा करती जरी

माणसांनी बाटती ही माणसे

कोवळ्या तान्ह्या कळ्या ना सोडल्या

सांग देवा कोणती ही माणसे

चार घटकेचा तमाशा जिंदगी

पण तरीही धावती ही माणसे

मी उजेडाची कशी आशा धरू

अंधकारा सोबती ही माणसे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy