STORYMIRROR

Abhijit Nagle

Romance

2  

Abhijit Nagle

Romance

टिळा

टिळा

1 min
2.7K


असा जीवनाचा लळा लागला रे

झरा वेदनेचा सखा वाटला रे

मुका वाटतो मी, परी मूक नाही

व्यथा सांगणारा गळा दाटला रे

किती मी तुझी, चाकरी रोज केली

प्रभू तू तरी ही, कुठे पावला रे

तिला साजणाची कधी याद यावी

तिचा एकटीचा असे मामला रे

कधी सावली का तुझ्या दूर गेली

पळूनी असा तू कुठे चालला रे

सुखांनीच दु:खे दिली फार मोठी

मला नियतीचा छडा लागला रे

जराशी उशिरा मला मौत यावी

तिने कुंकवाचा टिळा लावला रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance