STORYMIRROR

Abhijit Nagle

Romance

3  

Abhijit Nagle

Romance

'आकांत !'

'आकांत !'

1 min
14.2K


वादळांचा बेरका आकांत आहे

मी गतीचा वेगळा सिद्धांत आहे

घुसमटीने विश्व हे संतापलेले

बुध्द माझ्या अंतरी मी शांत आहे

आसवेही काढती आनंदयात्रा

बघ शहाण्यांचा खुळा तो प्रांत आहे

मी तुला भागायचे संवेदनांनी

की गुणावे स्पर्शुनी ही भ्रांत आहे

हा कसा खोटारडा हा देश आहे

चांदणेही सावळे धादांत आहे .


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance